रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावचा जन्माला आलेले आणि समस्त रत्नागिरी तालुक्यातील तळागाळातील कुणबी समाजातील काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या आर्थिक अडचणींची उणीव भरून काढण्यासाठी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सुभाष धाला किंजळे यांनी १९८३ सालात रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढी ची स्थापना ५५५ सभासद करून केली होती. किंजळे साहेब यांनी रत्नागिरी अर्बन बँकेवर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. गावात समाज संघटना उभारून स्थानिक जागेत समाजासाठी किसान भवन बांधण्यात आले तेथे त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले. महिंद्रा अँड महिंद्रा या नोकरीचा राजीनामा देऊन साहेब हॉटेल व्यवसायात उतरले आणि तेथे हि त्यांनी समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अश्या या थोर समाजनेत्याला भावपूर्ण आदरांजली.
समाजनेते मा. कै. सुभाष धाला किंजळे
संस्थापक अध्यक्ष